नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात सध्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप सुरू आहे. भारतीय महिला संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात शानदार कामगिरी करत विजय मिळवला. इकडे भारतात अन्य एक महिला क्रिकेटपटूने विक्रमी कामगिरी करून दाखवली आहे. आंध्र प्रदेशमध्ये सुरू असेलल्या १९ वर्षाखालील वनडे स्पर्धेत एका गोलंदाजाने १० विकेट घेण्याची कामगिरी केली.

अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात चंदीगडची जलद गोलंदाज काशवी गौतमने १० विकेट घेतल्या. काशवीने एकटीने अरुणाचलच्या सर्व फलंदाजांना बाद केले. काशवीच्या अफलातून गोलंदाजीमध्ये एका हॅटट्रिकचा देखील समावेश होता. भारतीय नियामक मंडळाने काशवीची ही कामगिरी सोशल मीडियावर शेअर केली.

काशवीने ४.५ षटकात १२ धावा देत १० विकेट घेतल्या. तिच्या या धमाकेदार गोलंदाजीमुळे अरुणाचलचा डाव फक्त २५ धावांवर संपुष्ठात आला. चंदीगडने प्रथम फलंदाजी करत १८६ धावा केल्या होत्या. अरुणाचलला या सामन्यात १६१ धावांनी पराभव स्विकारावा लागला.

संघाचे नेतृत्व करणाऱ्या काशवीने फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजीत चमक दाखवली. तिने ६८ चेंडूत ४९ धावा केल्या आणि त्यानंतर १० विकेट घेत इतिहास घडवला. काशवीने पहिल्या षटकात दोन, दुसऱ्या षटकात हॅटट्रिकसह ३ विकेट घेतल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here