मेलबर्न: पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर तुटून पडणाऱ्या भारताची लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मालाने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात शफालीने ४६ धावा केल्या. तिने ३४ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकार ४६ धावा केल्या. शफालीच्या या खेळीने एका वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे.

वाचा-
भारताच्या १६ वर्षीय शफालीने महिला टी-२० क्रिकेटमध्ये वेगाने धावा करण्याचा विक्रम केला. महिला टी-२० मध्ये शफालीचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. तिने १४७.९७च्या सरासरीने ४३८ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत इतक्या वेगाने धावा केल्या नाहीत.

वाचा-
या स्पर्धेत शफालीने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह २९ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३९ तर आता न्यूझीलंडविरुद्ध ४६ धावांची खेळी केली. स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती अव्वल स्थानावर आहे. शफालीने तीन सामन्यात ६६ चेंडूत ११४ धावा केल्या आहेत.

महिला टी-२० मध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट (कमीत कमी ४०० धावा)
शफाली वर्मा- १४७.९७ स्ट्राइक रेटने ४३८ धावा

क्लोई ट्रायॉन- १३८.३१ स्ट्राइक रेटने ७२२ धावा

एलिसा हेली- १२९.६६ स्ट्राइक रेटने १,८७५ धावा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here