नवी दिल्ली: आयपीएलच्या १३ व्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. येत्या २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील संघाने कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवर सोपवली आहे.

वाचा-
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे हैदराबाद संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. २०१८ मध्ये वॉर्नरवर आयपीएल खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाने बॉल टॅपरिंग प्रकरणी वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घातली होती. त्यामुळे त्याला आयपीएल देखील खेळता आले नव्हते. पण २०१९च्या स्पर्धेत त्याने हैदराबाद संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.

वाचा-
वॉर्नरने याआधी देखील हैदराबादचे नेतृत्व केले आहे. २०१६ मध्ये वॉर्नर कर्णधार होता आणि संघाला विजेतेपद देखील मिळवून दिले होते. तर २०१८ मध्ये अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्यांचा पराभव झाला होता.

वाचा-
बॉल टॅपरिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर वॉर्नरने हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. २०१८ आणि २०१९ च्या हंगामात केन विल्यमसन याने नेतृत्व केले होते. गेल्या वर्षी हैदराबादला चौथ्या स्थाावर समाधान मानावे लागले होते. यावेळी हैदराबादचा पहिला सामना एक एप्रिल रोजी मुंबई संघाविरुद्ध आहे.

वॉर्नरची आयपीएलमधील कामगिरी
२०१५- ५६२ धावा
२०१७- ८४८ धावा
२०१९- ६४२ धावा

एकूण १२६ सामने ४ हजार ७०६

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here