ख्राइस्टचर्च: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना शनिवारपासून मैदानावर होणार आहे. या मैदानासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक गुगली टाकली.

वाचा-
भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने या मैदानाचा फोटो शेअर करून खेळपट्टी शोधा असा प्रश्न विचारला आहे. या फोटोत मैदानावरील हिरवळ आणि खेळपट्टीवरील हिरवळ यात फारसा फरक दिसत नाही. त्यामुळे मैदानात खेळपट्टी कुठे आहे असा प्रश्न निर्माण होतो.

वाचा-
बीसीसीआयने नेमकी हीच गोष्ट हेरली आणि फोटो शेअर करत गुगली घेतली आहे. या मैदानावरील सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भारतीय संघाने वेलिंग्टन येथे झालेला सामना गमावला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

वाचा-
पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना धावा करता आल्या नव्हत्या. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे वगळता विराट कोहली, पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजार यांना धावा करता आल्या नाहीत.

वाचा-

आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंड संघात नील वॅगनरचा समावेश झाला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आणखी वेगवान आणि उसळच्या चेंडूचा सामना करावा लागू शकतो. जर भारताने या सामन्यात विजय मिळवला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताचा हा पहिला मालिका पराभव ठरेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here