ख्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय संघासाठी काळजीत टाकणारी बातमी समोर आली आहे. भारताचा सलामीवीर गुरूवारी सराव करू शकला नाही. पृथ्वीच्या पायाला सूज आली आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

वाचा-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी पृथ्वीची रक्त तपासणी केली जाणार आहे. त्यात सूज कशामुळे आली आहे याचा शोध घेतला जाईल. पृथ्वीचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच शुक्रवारी तो कसोटी खेळणार की नाही यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जर पृथ्वी शुक्रवारी सराव सत्राासाठी आला नाही तर तो सामना देखील खेळणार नाही यावर शिक्कामोर्तब होईल.

वाचा-

पृथ्वी नसेल तर…
दरम्यान, पृथ्वी शॉ जर सामना खेळू शकला नाही तर हा मयांक अग्रवालसह सलामीला उतरू शकतो. गुरुवारी गिलने नेटमध्ये सराव केला. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सरावादरम्यान गिल सोबत चर्चा केली.

वाचा-
पृथ्वीची सूज गंभीर नसेल असा संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे. पहिल्या सामन्यात पृथ्वीला धावा करण्यात अपयश आले होते. पहिल्या डावात पृथ्वीने १६ तर दुसऱ्या डावात १४ धावांवर तो बाद झाला होता.

वाचा-
पृथ्वीच्या जागी दुसऱ्या कसोटीत शुभमन गिल याला संधी द्यावी अशी चर्चा होती. पण कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी सलामीला येईल असे स्पष्ट केले होते. पृथ्वी फिट असेल तर त्यालाच संधी दिली जाईल असे विराट म्हणाला.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here