नवी दिल्ली: स्पर्धेला जवळ आली आहे. अशातच चीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्रातील या सर्वात मोठ्या इव्हेंटवर संकट निर्माण झाले आहे. आता दबक्या आवाजात ही स्पर्धा रद्द करावी लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

वाचा-
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या एका सदस्याने प्रथमच ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. स्पर्धा सुरू होण्यास फक्त १४८ दिवस शिल्लक आहेत. करोना व्हायरस वेगाने जगभर पसरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समितीचे सदस्य असलेले डिक पाउंड यांनी जपान टाइम्सला सांगितले की, ही एक नवी लढाई आहे आणि आपल्याला त्याचा सामना करावा लागले. हा व्हायरस नियंत्रणात आहे का ? आपल्याला इतका विश्वास आहे का की आपण टोकिओला जाऊ शकू?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

वाचा-
अर्थात अद्याप स्पर्धे होणार की नाही याबाबत कोणताही अलर्ट दिला गेला नाही. किंवा स्पर्धा अन्य ठिकाणी घेण्यासंदर्भात विचार केला गेला नाही. पण ज्या पद्धतीने करोना वाढत आहे त्यावरून अनुभवी अधिकारी देखील काळजीत पडले आहेत.

टोकियोत एक मार्च रोजी होणारी मॅरेथॉन स्पर्धा काही निवडक स्पर्धकांसाठीच आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत ३८ हजार जण भाग घेणार होते, असे आयोजकांनी सांगितले.

वाचा-
करोनाचे रुग्ण इटली, इराण आणि दक्षिण कोरियात आढळले आहेत. बुधवारी ऑस्ट्रिया, क्रोएशिया आणि स्वित्झर्लंडमध्ये देखील करोनाचे रुग्ण आढळले होते. या सर्व रुग्णांचा इटली दौरा झाला होता. अमेरिकेने हा व्हायरस जगभर पसरण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here