ख्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची काळजी वाढली आहे. भारताचा जलद गोलंदाज या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. इशांतला दुखापत झाली असून तो शुक्रवारी सराव सत्रात भाग घेऊ शकला नाही.

वाचा-
पहिल्या कसोटी सामन्यात इशांतने ६८ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारख्या गोलंदाजांना फार यश मिळाले नव्हते आणि भारताचा १० विकेटनी पराभव झाला.

वाचा-
इशांत जर दुसऱ्या सामन्याला मुकला तर भारतीय संघासाठी तो मोठा झटका असले. टीम इंडिया मालिकेत १-०ने पिछाडीवर आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकावा लागेल. यासाठी इशांत संघात असणे गरजेचे आहे. इशांतच्या उजव्या गुढघ्याला दुखापत झाली आहे. अद्याप त्याचा वैद्यकीय अहवाल आलेला नाही. जर इशांत कसोटी खेळू शकला नाही तर त्याच्या जागी उमेश यादव किंवा नवदीप सैनी या दोघांपैकी एकाचा संघात समावेश होऊ शकतो. उमेशकडे ४५ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे.

वाचा-
रणजी सामन्यात दुखापत झाल्याने इशांत संघाबाहेर होता. त्यानंतर तो पहिल्या कसोटीत संघात आला.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here