नवी दिल्ली: प्रेम होण्यासाठी वयाचे बंधन नसते. ते कधी, कोठे आणि केव्हा होईल हे देखील सांगता येत नाही. बॉलीवडू असो की प्रेमाचे अनेक किस्से या आधी तुम्ही ऐकले असतील. पण गुन्ह्यासाठी तुरुंगात गेलेला आणि मग खटला लढणाऱ्या महिला वकीलासोबत प्रेम झाल्याचा किस्सा तुम्ही ऐकला नसेल.

वाचा-
प्रकरणी एका क्रिकेटपटूला शिक्षा झाली. संबंधित क्रिकेटपटू तुरुंगात शिक्षा भोगत होता. न्यायालयात सुनावणी सुरू असताना क्रिकेटपटूला त्याचा खटला लढणाऱ्या वकीलासोबत प्रेम झाले. आता ही स्टोरी इथे थांबत नाही. दोघांनीही कोणालाही न सांगता लग्न देखील केले.

वाचा-
पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद आमिरला इंग्लंडमध्ये मॅच फिक्सिंग केल्या प्रकरणी शिक्षा झाली. आयुष्यातील या कठीण प्रसंगी आमिरला प्रेम मिळाले. २०१० मध्ये आमिरवर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती. इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात तत्कालीन कर्णधार सलमान बट्टच्या सांगण्यावरून आमिरने नो बॉल टाकला होता.

वाचा-
मॅच फिक्सिंग प्रकरणी आमिरवर ५ वर्षाची बंदी घालण्यात आली. या काळात पाकिस्तान वंशांची नरगिस आमिरचा खटला लढत होती. खटला सुरू असताना दोघांना प्रेम झाले आणि त्यांनी गुपचुप लग्न देखील केले. २०१४ मध्ये शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर दोघांनी पारंपारिक पद्धतीने विवाह केला.

वाचा-
बंदी संपल्यानंतर २०१५ मध्ये आमिर पुन्हा एकदा क्रिकेट मैदानावर परतला. सध्या आमिरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो वनडे, टी-२० संघातून बाहेर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here