वाचा-
शिखरने त्याचा मुलगा झोरावर क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. क्रिकेटच्या इतिहासात असे फार कमी खेळाडू आहेत ज्यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे. पण आता शिखरने झोरावर याला क्रिकेटपटू करण्याचे ठरवले आहे.
वाचा-
आपल्या इन्स्टाग्रामवर शिखरने मुलाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत झोरावरच्या खांद्यावर क्रिकेटचे किट आहे. ‘तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता त्याच गोष्टीवर जेव्हा तुमचा मुलगा देखील प्रेम करतो तेव्हा छान वाटते’, असे शिखरने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे.
वाचा-
हा एक खास अनुभव असतो. ज्या गोष्टीवर (क्रिकेट) तुम्ही प्रेम करता. त्यावर मुलगा देखील प्रेम करतो. बद्दलचे प्रेम आमच्या दोघांच्या रक्तात आहे. मुलाला मोठे होताना पाहत आणि त्याचे स्वप्न पूर्ण होताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. बाबाचे मार्गदर्शन तुला नेहमीच मिळेल. लव्ह यू छोटे!, अशी पोस्ट शिखरने लिहली आहे.
या क्रिकेटपटूंच्या मुलांनी बॅट हातात पकडली
इफ्तिकार इली खान पटौदीचा मुलगा मन्सूर अली खान पटौदी, लाला अमरनाथ यांचा मुलगा मोहिंदर अमरनाथ, विजय मांजरेकर यांचा मुलगा संजय मांजरेकर, सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकर, योगराज सिंह यांचा मुलगा युवराज सिंह, रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. आता झोरावरचा देखील या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times