सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी जलद गोलंदाज ब्रेट लीने आयसीसी महिली टी-२० वर्ल्ड कप संदर्भात एक मोठ वक्तव्य केले आहे. स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने जवळपास संपले आहेत. भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून सर्व प्रथम उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाच्या या कामगिरीवर देखील खुश आहे.

वाचा-
भारताच्या १६ वर्षीय स्टार शफाली वर्माच्या कामगिरीमुळे संघाला अशी धमाकेदार कामगिरी करत आली. शफाली सारख्या खेळाडूमुळेच यावेळी भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचेल असे भाकित ब्रेट लीने केले आहे. शफाली सोबत पूनम यादवने भारताकडून शानदार कामगिरी केल्याचे तो म्हणाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने साखळी फेरीतील सर्व चार सामने जिंकले आहेत. आता भारत ५ मार्च रोजी सेमीफानलमधील सामना खेळणार आहे.

वाचा-
भारतीय संघ कधीच फायनलमध्ये पोहोचला नाही. पण आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता अन्य संघांपेक्षा भारतीय संघ वेगळा आहे. त्यांच्याकडे शफाली आणि पूनम सारखे खेळाडू आहेत. जे बॅट आणि चेंडूने चांगली कामगिरी करत आहेत, असे ली म्हणाला.

शफालीने स्पर्धेत आतापर्यंत ४७,४६,३९ आणि २९ धावा केल्या आहेत. सेमीफायनलमध्ये देखील ती मोठी धावसंख्या करेल असा विश्वास लीने व्यक्त केला.

वाचा-
जगातील अन्य संघांकडे सर्वोत्तम खेळाडू आहेत. पण कौरकडे असे खेळाडू आहेत जे मोठ्या खेळाडूंची साथ देतात आणि असे खेळाडू अपयशी ठरल्यावर महत्त्वाचे योगदान देतात. विरोधी संघाने विशेष प्रयत्न केले तरच भारताचा उपांत्य फेरीत पराभव होईल, असे ली म्हणाला. भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. त्यामुळे त्यांना फायनलमध्ये स्थान मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here