नवी दिल्ली : तब्बल ९ वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ साली आयपीएलमध्ये जे काही घडलं होतं, त्याच्या पूर्णपणे उलट गोष्टी २०२१ साली पाहायला मिळत आहेत. या गोष्टींमधून आता चेन्नईचा संघ जेतेपद पटकावणार, असे संकेत मिळाले आहेत.

९ वर्षांपूर्वी या दोन्ही संघांबाबत नेमकं काय घडलं होतं, जाणून घ्या…
आयपीएल २०१२ च्या गुणतालिकेत कोलकाता दुसऱ्या क्रमांकावर आणि चेन्नईचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. त्याचबरोबर या हंगामात चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. क्वालिफायर-१ बद्दल बोलायचे झाले, तर २०१२ मध्ये केकेआरने दिल्लीला प्रथम फलंदाजी करत पराभूत केले होते. त्याचबरोबर या मोसमात चेन्नईने धावांचा पाठलाग करत क्वालिफायर-१ मध्ये दिल्लीचा पराभव केला. २०१२ मध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करत एलिमिनेटर सामना जिंकला होता. या हंगामात कोलकात्याने धावांचा पाठलाग करताना एलिमिनेटर सामना जिंकला. २०१२ मध्ये चेन्नईने क्वालिफायर-२ मध्ये प्रथम फलंदाजी केल्यानंतरही दिल्लीला हरवले. त्याच वेळी, या हंगामात, कोलकात्याने दुसऱ्यांदा फलंदाजी करताना क्वालिफायर-२ दिल्लीचा पराभव केला. आयपीएल २०१२ च्या अंतिम फेरीत कोलकाताने नंतर फलंदाजी करताना चेन्नईचा पराभव केला. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करेल आणि यावेळी अंतिम फेरीत कोलकाताचा पराभव करून विजेतेपद पटकावेल? योगायोग या दिशेने बोट दाखवत आहे आणि माजी क्रिकेट हेमांग बदाणीनेही याबाबतच ट्विट केले आहे. दरम्यान, या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ धावांचा पाठलाग करण्यास प्राधान्य देत आहेत. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना दोन्ही संघांना यश मिळाले आहे. आयपीएल २०२१ चा विजेता कोण असेल? या प्रश्नाचे उत्तर शुक्रवारीच मिळेल.

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्जनंतर कोलकाता नाईट रायडर्सनेही बुधवारी (१३ ऑक्टोबर) अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता या दोन्ही संघांमधील जेतेपदाची लढत शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत या दोन्ही संघांची कामगिरी आश्चर्यकारक राहिली आहे. चेन्नईने स्पर्धेच्या पहिल्या हाफपासून चांगली सुरुवात केली आणि दुसऱ्या हाफमध्येही त्यांचा फॉर्म कायम ठेवला. दुसरीकडे, कोलकाताने पहिल्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी केली होती. पण आता दुसऱ्या टप्प्यात कामगिरी सुधारत अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला आहे. अंतिम सामना कोण जिंकेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघ चांगले क्रिकेट खेळत आहेत, पण धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचं पारडं थोडं जड वाटत आहे. चेन्नईचा फॉर्म आश्चर्यकारक आहे, पण एक योगायोग त्याच्या चॅम्पियन बनण्याकडेही बोट दाखवत आहे. आयपीएलमध्ये ९ वर्षांपूर्वी जे काही घडले, ते २०२१ मध्ये अगदी उलट घडत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here