सिडनी: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सर्व प्रथम उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रुप ए मध्ये भारतीय संघाने सर्व सामने जिंकत अव्वल स्थान मिळवले. भारताचा उपांत्य फेरीतील सामना ५ मार्च रोजी सिडनीत होणार आहे. पण भारताला कोणत्या संघाविरुद्ध खेळायचे आहे हे निश्चित झाले नव्हेत. त्यावर आज शिक्कामोर्तब झाला.

वाचा-

ग्रुप ए मधील अव्वल संघ विरुद्ध ग्रुप बी मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी उपांत्य फेरीतील लढत होणार होती. ग्रुप बी मधील पहिल्या स्थानासाठी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होती. आज ग्रुप बी मधील अखेरचा साखळी सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणार होता. या सामन्यात आफ्रिकेने विजय मिळवल्यास ते पहिल्या स्थानावर पोहोचले असते. वेस्ट इंडिज संघ याआधीच स्पर्धे बाहेर पडला होता. त्यामुळे भारताची लढत इंग्लंड विरुद्ध की आफ्रिके विरुद्ध यासाठी आजचा सामना महत्त्वाचा होता. पण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पावसामुळे रद्द करावा लागला.

वाचा-
सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला एक गुण मिळाला आणि ७ गुणांसह ते पहिल्या स्थानावर गेले. तर इंग्लंड ६ गुणांसह दुसऱ्या. त्यामुळे पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना ५ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सिडनी मैदानावर होईल. स्पर्धेतील दुसरी उपांत्य फेरीतील लढत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता सिडनी मैदानावर होणार आहे. तर अंतिम लढत ८ मार्च रोजी मेलबर्न मैदानावर होईल.

वाचा-
उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांपैकी ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक चार वेळा तर इंग्लंडने एकदा विजेतेपद मिळवले आहे. भारतीय संघ एकदाही अंतिम फेरीत पोहोचलेला नाही. भारताने याआधी २००९, २०१० आणि २०१८ मध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आफ्रिकेचा संघ देखील एकदाही फायनलमध्ये पोहोचलेला नाही. २०१४ मधील उपांत्य फेरी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.

वाचा-
उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या गतविजेत्यांचा पराभव करून भारत आणि आफ्रिका हे दोन नवे संघ अंतिम फेरीत पोहोचतात का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. स्पर्धेत भारत असा एकमेव संघ आहे ज्यांनी एकही सामना गमवलेला नाही.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here