वाचा-
…
अंतिम मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर होणार आहे. दुबईचे पिच थोडी धिमी असली तरी ती फलंदाजीसाठी शानदार आहे. या मैदानावर दुसऱ्या सत्रात झालेल्या १२ लढतीत ९ वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावरील सरासरी धावसंख्या १५२ इतकी आहे. याचा अर्थ जो संघ टॉस जिंकणार तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल आणि त्याला विजयाची मोठी संधी असेल.
वाचा-
या मैदानावर चेन्नई संघाने दुसऱ्या सत्रात ४ सामने खेळले आहेत त्यापैकी २ सामन्यात त्यांचा विजय झालाय तर दोनमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. केकेआरने या मैदानावर २ सामने खेळले असून त्यापैकी एकात विजय तर एकात पराभव झालाय. दोन्ही संघात झाल्या २४ पैकी १६ लढतीत चेन्नईने विजय मिळवला आहे. तर गेल्या ६ लढतीचा विचार केल्यास ५ लढतीत चेन्नईने बाजी मारली आहे. पण असे असले तरी २०१२च्या फायनलमध्ये केकेआरने चेन्नईचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.
वाचा-
चेन्नईने २०१०, २०१२ आणि २०१८ अशी ३ विजेतेपद मिळवली आहे. आयपीएलमधील सर्वाधिक फायनल मॅच खेळणारा संघ अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी १२ पैकी ९ हंगामात फायनलमध्ये धडक मारली आहे. पण त्यापैकी ५ वेळा त्यांचा पराभव झालाय. तर केकेआरने दोन फायनल खेळल्या असून त्या दोन्हीमध्ये त्यांनी विजय मिळवलाय.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times