वाचा- आजवर कोणाला न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड होणार; धोनी ठरणार जगातील पहिला…
याच मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने साखळी फेरीत मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात १५६ धावांचा यशस्वी बचाव केला होता. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात या मैदानावर झालेल्या १२ पैकी ९ लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. दुबईची खेळपट्टी थोडी धिमी असली तरी ती फलंदाजीसाठी चांगली आहे. या मैदानावरील सरासरी धावसंख्या १५२ इतकी आहे. दुबईचे हवामान गरम असल्याने पण खेळाडू गेल्या काही दिवासांपासून तेथे असल्याने याचा फार फटका बसणार नाही.
चेन्नईने क्वालिफायल १ मध्ये दिल्ली विरुद्ध झालेल्या लढतीत संघात कोणताही बदल केलेला नाही. धोनीने या अंतिम सामन्यात संघातील सर्वात अनुभवी खेळाडू सुरेश रैनाच्या जागी रॉबिन उथप्पावर विश्वास दाखवला आहे. त्याने दिल्लीविरुद्ध वादळी अर्धशतक झळकावले होते.
असा आहे चेन्नई सुपर किंग्जचा संघ-
फाफ डु प्लेसिस, itतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी (क), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवूड
असा आहे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ-
शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (प्रमुख), दिनेश कार्तिक, साकिब अल हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times