सिडनी: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने ग्रुप फेरीत शानदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. भारताने स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत आणि पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी त्यांना फक्त दोन विजयांची गरज आहे.

भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडच्या संघाचा पराभव करावा लागले आणि त्यासाठी भारतीय संघाला ऐतिहासिक कामगिरी करावी लागले. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ लढती झाल्या आहेत. त्यापैकी पाचही लढती इंग्लंडने जिंकल्या आहेत. ११ जून २००९ मध्ये ग्रुप मॅच मध्ये इंग्लंडने १० विकेटनी, २९ सप्टेंबर २०१२ मध्ये ९ विकेटनी, २६ मार्च २०१४ मध्ये ५ विकेटनी, २२ मार्च २०१६ मध्ये २ विकेटनी तर २२ नोव्हेंबर २०१८ मध्ये सेमीफायनल लढतीत इंग्लंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला होता.

वाचा-
इंग्लंड संघाने पहिल्या महिला टी-२० स्पर्धेचे विजेतेपद तर ३ वेळा उपविजेतेपद मिळवले आहे. गेल्या म्हणजेच २०१८ मध्ये इंग्लंडने भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव केला होता. आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये लढणार आहेत. या दोन्ही संघात १९ टी-२० सामने झाले आहेत त्यापैकी इंग्लंडने १५ तर भारताने ४ सामने जिंकले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेतील अखेरच्या लढतीत भारताने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. भारतीय संघासाठी ही एक मोठी दिलासा देणारी बाब आहे.

वाचा- आतापर्यंतचा भारताचा प्रवास
भारताने साखळी फेरीतील चारही सामन्यात विजय मिळवला आहे. पण त्यांना एकदाही १५०च्या पुढे धावसंख्या करता आली नाही.

>> ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ धावांनी विजय
>> बांगलादेशविरुद्ध १८ धावांनी विजय
>> न्यूझीलंडविरुद्ध ३ धावांनी विजय
>> बांगलादेशविरुद्ध ७ विकेटनी विजय

इंग्लंडचा आतापर्यंतचा प्रवास
>> दक्षिण आफ्रिकेकडून ६ विकेटनी पराभव
>> थायलंडवर ९८ धावांनी विजय
>> पाकिस्तानवर ४२ धावांनी विजय
>> वेस्ट इंडिजवर ४६ धावांनी विजय

भारतासाठी शफाली वर्माचा शानदार फॉर्म आणि गोलंदाजांची कामगिरी ही सर्वात जमेची बाजू आहे. तर इंग्लंडकडून नॅटली सायव्हरने चार सामन्यात २०२ धावा केल्या आहेत. तर कर्णधार हिथर नाइट ६४.३३ च्या सरासरीने १९३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताची शफाली वर्मा आहे. गोलंदाजांमध्ये ४ सामन्यात ९ विकेटसह पूनम यादव पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंडची सोफी एसलस्टोन ८ विकेट घेतल्या आहेत.

वाचा-
भारतीय संघासाठी काळजी करण्याच्या दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे भारताची सलामीवीर स्मृती मानधनाची खराब कामगिरी. स्पर्धेत स्मृतीने ३ सामन्यात फक्त ३८ धावा केल्या आहेत. दुसरी काळजी म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौरचे अपयश होय. कौरने ४ सामन्यात फक्त २६ धावा केल्या आहेत. भारताच्या या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे.

भारतीय संघाला अंतिम फेरी गाठायची असेल तर त्यांनी आतापर्यंत न केलेली कामगिरी म्हणजेच इंग्लंडचा पराभव करावा लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here