मुंबई: संपूर्ण जगभरात खळबळ उडवणाऱ्या करोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक सारख्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेवर अनिश्चितचे सावट निर्माण केले आहे. या व्हायरसमुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. चीनमधून हा व्हायरस आता जगभरात पसरत चालला आहे. अशातच या महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणाऱ्या स्पर्धेवर करोनाचा काही परिणाम होईल का अशी शंका व्यक्त केली जात आहे. भारतात देखील करोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात आता बीसीसीआयने अधिकृत मत व्यक्त केले आहे.

वाचा-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्य आणि आयपीएलच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य बृजेश पटेल यांनी स्पर्धेला करोना व्हायरसपासून कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे. या स्पर्धेला करोनापासून कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींवर नजर ठेऊन आहोत. कोणत्याही खेळाडूला धोका नाही, असे पटेल म्हणाले.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाची सुरूवात २९ मार्च पासून मुंबईत होत आहे. विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिली लढत होत आहे. तर अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईतच होईल.

वाचा-
अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील करोनाचा कोणताही धोका भारतात नाही, असे म्हटले आहे. दरम्यान कालच इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांना सांगितले की, त्यांच्या संघातील खेळाडू श्रीलंका दौऱ्यात अन्य खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. इंग्लंडच्या खेळाडूंना करोना व्हायरसचा धोका असल्याने खेळाडू श्रीलंका दौऱ्यात दुसऱ्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नसल्याचे रूट म्हणाला.

वाचा-
इंग्लंडचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी रूटला संदर्भात एक प्रश्न विचारला त्यावर बोलताना तो म्हणाला, हस्तांदोलन करण्याऐवजी आम्ही एकमेकांना अभिवादन करू. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी पडले होते. अनेकांना ताप आणि पोटदुखीचा सामना करावा लागला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here