नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामाला लवकरच सुरूवात होत आहे. अनेक संघांनी सराव सत्राला सुरूवात केली असून देशातील आणि परदेशातील खेळाडू त्याच सहभागी होत आहेत. आयपीएलमधील एक असाच परदेशी खेळाडू भारतात आला आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

वाचा-
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू याने गंगा नदीत स्नान करत असलेला फोटो शेअर केला आहे. जॉन्टीने ऋषिकेश येथे गंगा नदीत अंघोळ केली.

वाचा-

गंगा नदीच्या थंड पाण्यात अंघोळ केल्यानंतर भौतिक आणि आध्यात्मिक समाधान मिळाले. या नदीत अंघोळ केल्याने मोक्ष मिळतो, असे जॉन्टीने म्हटले आहे.

अशा प्रकारे चर्चेत येण्याची जॉन्टीची ही पहिली वेळ नाही. त्याचे भारताबद्दलचे प्रेम अनेकदा दिसून आले आहे. जॉन्टीच्या दुसऱ्या मुलीचा जन्म मुंबईत झाला होता आणि मुलीचे नाव त्याने इंडिया असे ठेवले आहे. जॉन्टी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच आहे. फक्त आयपीएलसाठी नाही तर तो बराच काळ भारतात राहतो.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here