सिडनी: पहिल्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद, तीन उपविजेतेपद आणि एक वेळा उपांत्य फेरी अशी आहे इंग्लंड संघाची कामगिरी… पण यावेळी इंग्लंड संघाला उपांत्य फेरीतूनच बाहेर पडावे लागले. भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि गट फेरीतील गुणांच्या आधारे भारत अंतिम फेरीत पोहोचला.

वाचा-

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया सोबत इंग्लंडचा संघ देखील विजेतेपदपाचा दावेदार होता. पण त्यांना अंतिम फेरीत पोहोचता आले नाही. स्पर्धेत इंग्लंड संघाला गट फेरीतील एक पराभव चांगलाच महाग पडला. ग्रुप बी मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर सलग तीन सामने जिंकत इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचले. पण गटात ते ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. याउटल आफ्रिकेने ३ सामने जिंकले तर अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एक गुण मिळाले. ग्रुप बी मध्ये आफ्रिका ७ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचले. इंग्लंडला आफ्रिकेविरुद्धचा पराभव महाग पडला.

वाचा-
भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंडची कर्णधार देखील ही गोष्ट बोलून दाखवली. वर्ल्ड कपमधून अशा प्रकारे बाहेर पडू असे वाटले नाही. सेमी फायनल लढतींसाठी राखीव दिवस असायला हवा असे ती म्हणाली.

वाचा-
अशा प्रकारे बाहेर पडल्यामुळे निराशा होते. आम्हाला फायनलमध्ये पोहोचण्याची आशा नव्हती. पण आम्ही उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहोचू हे आम्हाला माहित होते आणि त्याप्रमाणे आम्ही कामगिरी देखील केली, असे नाइटने सांगितले.

खराब हवामानाने खेळ बिघडवला. उपांत्य फेरीसाठी आम्ही खुप तयारी केली होती. स्पर्धेची सुरुवात आमच्यासाठी चांगली झाली नाही. पण त्यानंतर आम्ही चांगली कामगिरी केल्याचे नाइट म्हणाली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here