सिडनी: आयसीसी टी-२० महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम लढत यांच्यात ८ मार्च रोजी मेलबर्न मैदानावर होईल. उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ५ धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलिया संघाने २०१० पासून प्रत्येक अंतिम फेरीत खेळली आहे. २०१६ मध्ये त्यांचा वेस्ट इंडिजने पराभव केला होता. तर २०१८ मध्ये इंग्लंडचा पराभव करत त्यांनी चौथे विजेतेपद पटकावले होते.

वाचा-
गेल्या २१ फेब्रुवारी रोजी आयसीसी टी-२० वर्ल्ड कपला सिडनी येथून सुरूवात झाली होती. स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. आता या स्पर्धेतील अंतिम सामना पुन्हा या दोन्ही संघांमध्ये होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव करत धक्का दिला होता. त्यानंतर भारताने एकापाठोपाठ एक शानदार खेळी करत अंतिम फेरी गाठली.

वाचा-

तर ऑस्ट्रेलियाने देखील भारताविरुद्धचा पराभव वगळता अन्य सर्व सामने जिंकले आणि सलग पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ साली विजेतपद तर २०१६ मध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे.

वाचा-

ज्या दोन संघांनी स्पर्धेची सुरूवात केली तेच आता शेवट देखील करणार अशी कल्पना कोणी केली नसले. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्याने आफ्रिकेचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले.

वाचा-

भारताचा स्पर्धेतील प्रवासगट फेरी
>>ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय
>>बांगलादेशवर १८ धावांनी विजय
>>न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय
>>श्रीलंकेवर सात विकेटनी विजय
उपांत्य फेरी
>>इंग्लंडविरुद्ध पावसामुळे सामना रद्द

ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील प्रवासगट फेरी
>>भारताकडून १७ धावांनी पराभव
>>श्रीलंकेवर ५ विकेटनी विजय
>>बांगलादेशवर ८६ धावांनी विजय
>>न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय
उपांत्य फेरी
>>दक्षिण आफ्रिकवर ५ धावांनी विजय

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here