नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील एका अष्ठपैलू खेळाडूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे () अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पर्धा खेळण्यास परवानगी नाकारली आहे. येत्या ९ मार्चपासून सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात रणजी स्पर्धेतील अंतिम लढत होणार आहे.

बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातील अष्ठपैलू याला उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला केली होती. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुलीने ही विनंती फेटाळून लावली.

वाचा-
कंट्री फर्स्ट या धोरणानुसार बीसीसीआयने जडेजाला रणजी ट्रॉफीतील फायनल मॅच खेळण्याची परवानगी नाकारली. गांगुलीच्या मते पहिला देश महत्त्वाचा आहे. देशांतर्गत क्रिकेट नाही. सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यातील अंतिम सामना ९ ते १३ मार्च दरम्याान होणार आहे. याच काळात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. जडेजा भारताच्या मुख्य संघात आहे आणि त्यामुळेच बीसीसीआयने त्याला रणजी खेळण्यास परवानगी नाकारली.

वाचा-
जडेजा जरी हा सामना खेळणार नसला तरी भारतीय संघातील दोन स्टार खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान साहा हे सौराष्ट्रकडून खेळतील.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी गांगुलीला यासंदर्भात विनंती केली होती. पण रणजी सामन्यापेक्षा देश महत्त्वाचा असल्याने ही गांगुलीने विनंती फेटाळून लावली. आंतरराष्ट्रीय सामने नसतील तेव्हाच खेळाडू प्रथम श्रेणी सामन्यांसाठी उपलब्ध असतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here