चीनमधून हा वायरस आता जगभरात पसरत चालले असून बऱ्याच लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. क्रिकेटवरही आता या वायरसचा परीणाम होताना दिसत आहे. त्यामुळे या कोरोना वायरसमुळे आयपीएलवर नेमका काय परीणाम होणार, याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी आयपीएल स्पर्धेबाबत काही अपडेटही दिले आहेत.
आयसीसीची विश्वचषक स्पर्धा २०२३ साली होणार आहे. या स्पर्धेसाठी क्वालीफायर टूर्नामेंट १६ ते २६ मार्च या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार होती. ही स्पर्धा आता रद्द करण्याचा निर्णय घेत आहे. ही स्पर्धा मलेशिया येथे खेळवण्यात येणार होती. त्यामुळे ही स्पर्धा सध्याच्या घडीला रद्द करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. आता ही स्पर्धा पुढच्या वर्षी खेळवायची का, हा निर्णय आता बीसीसीआय घेणार आहे.
नेपाळ येथे एव्हरेस्ट प्रीमिअर लीग ही स्पर्धाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा १४ मार्चपासून खेळवण्यात येणार होती. या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल खेळणार होता, पण ही स्पर्धा रद्द केल्यामुळे आता गेलचा जलवा नेपाळमधील लोकांना यावेळी पाहता येणार नाही. नेपाळमध्ये एक कोरोना वायरस असलेला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे हा वायरस नेपाळमध्ये पसरू शकतो किंवा दास्त पसरू नये, यासाठी नेपाळच्या सरकारने हे पाऊल उचलल्याचे समजत आहे.
थायलंडमध्ये चार देशांची ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्यात येणार होती. ही स्पर्धा एप्रिल महिन्यात खेळवण्यात येणार होती, आता होणार की नाही, याबाबत संदिग्घता आहे.
एकिकडे कोरोना वायरसमुळे काही स्पर्धा रद्द होत असल्या तरी आयपीएल मात्र नियोजित वेळेत होणार आहे. कोरोना वायरसचा आयपीएलवर काय परीणाम होणार याबाबत गांगुली म्हणाले की, ” कोरोना वायरसचा आयपीएल स्पर्धेवर कोणताही परीणाम होणार नाही, असे मला वाटते. बीसीसीआय आणि आमच्या वैद्यकीय टीमने याबाबत योग्य ती पावले उचलली आहेत. जर वैद्यकीय टीमला काही संशयास्पद आढळले तर ते याबाबतीत योग्य ती पावले उचलू शकता. याबाबत संपूर्ण अधिकार आम्ही त्यांना दिले आहेत. त्यामुळे आयपीएलवर कोरोनाचा कोणताही परीणाम होणार नाही, अशी आशा मी बाळगली आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times