लंडन : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) पुन्हा एकदा बाबा होणार आहे. रोनाल्डोनं त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत नुकताच एक फोटो शेअर करत ही बातमी दिलीय. महत्वाचं म्हणजे जॉर्जिना जुळ्या मुलांना जन्म देणार आहेत. त्यामुळे रोनाल्डो आता चार नव्हे तर सहा मुलांचा बाबा होणार आहे.

रोनाल्डोला सध्या 11 वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर लिहिले की, “आम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघत आहे.”

रोनाल्डोचा महान विक्रम

पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला आहे. त्याने जुव्हेंट्स क्लब सोडला आहे. ख्रिस्तियोनो रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर अवॉर्ड जिंकले आहेत.पोर्तुगालच्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा तो खेळाडू आहे. रोनाल्डोने आपल्या शरीरावर कोणताही टॅटू गोंदवला नाही. तो वर्षातून अनेकवेळा रक्तदान करतो. त्यामुळे त्याने ही खबरदारी घेतलीय. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 102 गोल केले आहेत. तसेच आतापर्यंत 9 वेळा हॅट्रिक केली आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू अशी ख्याती असलेला पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोने फेब्रुवारीमध्ये  36 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

Cristiano Ronaldo Update : ख्रिस्तियानो रोनाल्डो होणार जुळ्या मुलांचा बाबा, इन्स्टाग्रामवर दिली आनंदाची बातमी

पोर्तुगाल संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या रोनाल्डोने पाचही वेळेस म्हणजेच 2004, 2008, 2012 आणि 2016, 2021 च्या युरो कपमध्ये गोल झळकावले आहेत. पोर्तुगालच्या वतीनं सर्वाधिक 106 गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. युरो कपमध्ये सर्वाधिक वय असतानाही एका सामन्यात 2 हून अधिक गोल करण्याचा मान त्यानं मिळवला आहे.  रोनाल्डोनं सर्वाधिक 5 युरो कप खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी अनेक खेळाडू 4 वेळा युरो कपमध्ये खेळले होते. पण, रोनाल्डो या स्पर्धेत पाचव्यांदा सहभागी होणारा पहिला खेळाडू ठरला आहे.sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here