वाचा-
स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघातील वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची पत्नी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाकडून खेळणार आहे. पत्नी एलिसाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी मिशेलने दक्षिण आफ्रिकेचा दौरा अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या वनडेत मिशेल खेळणार नाही. तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तेही पत्नी एलिसाला प्रोत्साहन देण्यासाठी. आयुष्यात नेहमीच न येणारा हा क्षण मिशेलला सोडायचा नाही. मिशेलच्या या निर्णयाला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने देखील परवानगी दिली आहे.
वाचा-
मिशेलसाठी पत्नीला अंतिम सामन्यात खेळताना पाहणे ही विशेष गोष्ट असेल. पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा त्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिल्याचे कोच जस्टिन लॅगर यांनी सांगितले.
तसेच तो पुन्हा मायदेशात परत जातोय. त्यामुळे त्याला विश्रांती देखील मिळेल. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी तो पुन्हा संघात परत येईल, असे लॅगर म्हणाले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times