मेलबर्न: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळपट्टी, हवामान आणि दोन्ही संघांचे रेकॉर्ड याबद्दल जाणून घेऊयात…

स्पर्धेत अनेक सामन्यात पावसाने अडथळे आणले होते. पण आज होणाऱ्या अंतिम सामन्यात पावसाची शक्यता नाही. तापमान १० ते २२ डिग्री इतके असेल.

अशी असेल खेळपट्टी
अंतिम सामन्यात ज्या मैदानावर सामना होणार हे ते मेलबर्न मैदान फलंदाजीसाठी चांगले मानले जाते. पण सुरूवातीला जलद गोलंदाजांना फायदा होऊ शकतो असे मानले जाते. अर्थात फक्त मेलबर्नच नाही तर ऑस्ट्रलियातील सर्व मैदानावर जलद गोलंदाजांना फायदा होत असते. असे असले तरी भारताची फिरकीपटू पूनम यादवने आतापर्यंत ८ विकेट घेतल्या आहेत. या मैदानावर टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ वेळा तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ वेळा विजय मिळवला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
एकूण सामने- १९
ऑस्ट्रेलिया- १३ विजय
भारत- ६ विजय

भारताचा स्पर्धेतील प्रवासगट फेरी
>>ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय
>>बांगलादेशवर १८ धावांनी विजय
>>न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय
>>श्रीलंकेवर सात विकेटनी विजय
उपांत्य फेरी
>>इंग्लंडविरुद्ध पावसामुळे सामना रद्द

ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील प्रवासगट फेरी
>>भारताकडून १७ धावांनी पराभव
>>श्रीलंकेवर ५ विकेटनी विजय
>>बांगलादेशवर ८६ धावांनी विजय
>>न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय
उपांत्य फेरी
>>दक्षिण आफ्रिकवर ५ धावांनी विजय

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here