भारतीय महिला संघाने अखेर ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काही वेळातच अंतिम फेरीचा सामना सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघासमोर आव्हान असेल ते बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे. पण भारताला ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यांना चांगला खेळ करावाच लागेल. पण त्यापेक्षाही त्यांना एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष द्यावे लागणार आहे. कारण ही गोष्ट केल्यास भारताला विश्वचषक जिंकण्याची एक नामी संधी असेल.

भारतीय संघ पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र सहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.त्याचबरोबर त्यांनी चारवेळा विश्वचषकावर मोहोर उमटवली आहे. त्याचबरोबर हा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्येच होतो आहे, त्यामुळे येथील वातावरण, खेळपट्टी आणि प्रेक्षक हे मुख्यत्वेकरून ऑस्ट्रेलियाच्या बाजूने असणार आहेत. त्यामुळे भारताने या सामन्यात विजयासाठी नेमके करायचे काय, हा प्रश्व सर्वांपुढे असेल.

वाचा-

भारतीय संघाकडे चांगली गुणवत्ता आहे आणि त्यांची कामगिरीही चांगली होत आहे. जर या दोन्ही गोष्टी भारताकडे नसत्या तर ते अंतिम फेरीत पोहोचू शकले नसते. पण या अति महत्वाच्या सामन्यात भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यांनी एक गोष्ट करायला हवी आणि ती म्हणजे त्यांनी दडपण योग्य पद्धतीने हाताळायला हवे. कारण अंतिम फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांवर प्रचंड दडपण असते. हे दडपण जो संघ योग्य पद्धतीने हाताळतो तोच विजयी ठरतो, असे आतापर्यंत पाहिले गेले आहे. त्यामुळे विजयाची त्रिसूत्री ठरवताना भारतीय संघाने दडपण हाताळण्याचाही विचार करायला हवा.

वाचा-

आतापर्यंतच्या बऱ्याच विश्वचषकामध्ये ही गोष्ट पाहायला मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील २००३ साली झालेला दक्षिण आफ्रिकेतील अंतिम सामना आठवून पाहा. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. ऑस्ट्रेलियाने त्यावेळी साडे तिनशेच्या पुढे धावा केल्या. हा धावांचा डोंगर पाहून भारतीय संघ दबावाखाली आला आणि त्यांनी सामना गमावला होता. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या कशी पार करता येईल, याचा विचार न करता भारतीय संघ दडपणाच्या ओझ्याखाली दबलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे भारताला जर हा विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यांना योग्यपद्धतीने दडपण हाताळावे लागेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here