नवी दिल्ली: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात थोड्याच वेळात फायनल सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांना त्याच्या देशातील आजी माजी क्रिकेटपटू शुभेच्छ देत आहे. या दोन्ही संघांना त्यांच्या देशाच्या पंतप्रधानांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा-

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आठ मार्च म्हणजेच महिला दिना दिवशी फायनल सामना होत आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाला शुभेच्छा देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले. मॉरिसन म्हणतात, मोदी, उद्या मेलबर्नवर महिला टी-२० वर्ल्ड कपचा फायनल सामना होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर मोठ्या संख्येने चाहते येतील आणि दोन्ही संघ चांगली कामगिरी करतील. मॅच सर्वोत्तम होईल आणि सर्वत्र ऑस्ट्रेलियाचा जलवा असेल…

वाचा-

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांना पंतप्रधान मोदी यांनी ट्विटवरून उत्तर दिले. मॉरिसन, टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मोठी लढत होत आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि महिला दिनाच्या शुभेच्छा. सर्वोत्तम संघाचा विजय होईल. ब्लू माउंटेस प्रमाणे उद्या मेलबर्न क्रिकेट मैदान ब्लू होईल, असे मोदींनी म्हटले आहे.

वाचा- ..

मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या फायनलसाठी ७५ हजारहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. सामन्यासाठी ९० हजार चाहते येण्याची शक्यता आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here