ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. सलामीवीर एलिसा हिलीने हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण हिलीने यावेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
हिलीने यावेळी भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत ३९ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या. हिली बाद झाल्यावर बेथ मुनीनेही आक्रमक फलंदाजी केली आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला भारतासमोर धावांचा डोंगर उभारता आला.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. आतापर्यंत फॉर्मात असलेली भारताची सलामीवीर शेफाली वर्मा ही फक्त दोन धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताचे फलंदाज सातत्याने बाद होत राहीले आणि ऑस्ट्रेलियाने भारतावर सहज विजय मिळवला.
भारतीय संघ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीती पोहोचला, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघ पारभूत होण्याच्या मार्गावर आहे. पण या अंतिम फेरीचा एक टर्निंग पॉइंट ठरला आहे. त्यामुळेच भारताला हा सामना गमवावा लागला असे म्हटले जात आहे.
ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. सलामीवीर एलिसा हिलीने हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण हिलीने यावेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. आणि हाच या सामन्याच टर्निंग पॉइंट ठरला.
हिलीने पहिल्या चेंडूवर दीप्ती शर्माला चौकार लगावत धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण त्यानंतर पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर दीप्तीने स्वत:च्याच गोलंदाजीवर हिलीचा झेल सोडला. त्यानंतर हिलीच्या फलंदाजीचे तुफान मैदानात पाहायला मिळाले. हिलीने ३९ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या आणि त्यामुळेच सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला. चौथ्या षटकातही ऑस्ट्रेलियाची दुसरी सलामीवीर बेथ मुनीला जीवदान मिळाले, पण तोपर्यंत हिलीने भारतीय गोलंदाजीला चांगलेच धारेवरव धरले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times