मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा तोंडावर असताना या मालिकेत काही भारतीय खेळाडूंना विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती. पण दुखापतीमुळे बाहेर असेलल्या रोहित शर्मा वगळता अन्य कोणाला संघाबाहेर ठेवले नाही.

वाचा-
आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्माच्या जागी पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आला आहे. रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे.

हार्दिक आणि भुवनेश्वरचे कमबॅक
गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्या आणि जलद गोलंदाज यांचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. हार्दिकला न्यूझीलंड दौऱ्यात संघात संधी मिळाली असती पण तो फिट नसल्याने त्याला दौरा मुकावा लागला. भुवनेश्वर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत जखमी झाला होता. त्यानंतर उपचारासाठी तो लंडनला गेला होता. त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय निवड समितीचे नवे प्रमुख सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखालील प्रथमच संघाची निवड झाली आहे. जोशी यांनी काही दिवासांपूर्वीच प्रसाद यांची जागा घेतली होती.

असा आहे भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.

अशी आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका

पहिली वनडे- १२ मार्च धर्मशाळा
दुसरी वनडे- १५ मार्च लखनऊ
तिसरी वनडे- १८ मार्च कोलकाता

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here