नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपद मिळवले. आयसीसीद्वारे आयोजित महिला वनडे वर्ल्ड कप आणि टी-२० वर्ल्ड कप स्पर्धांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत ११ विजेतेपद मिळवली आहे. अशी कामगिरी पुरुष संघांमध्ये देखील कोणत्याही संघाला करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया संघाच्या या कामगिरीवर नजर टाकल्यास विजेतेपदावर त्यांचीच मक्तेदारी असल्याचे दिसून येते. जाणून घेऊयात ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदावर….

वाचा-

वनडे वल्ड कप-
महिला वनडे वर्ल्ड कपला १९७३ साली सुरूवात झाली. त्यानंतर आतापर्यंत ११ वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक विजेतेपद ऑस्ट्रेलियाने मिळवली आहेत. ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कपची ६ विजेतेपद मिळवली आहेत. सर्व प्रथम त्यांनी १९७८ साली दुसऱ्या वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर १९८२ आणि १९८८ अशी सलग तीन विजेतेपद मिळवून ऑस्ट्रेलियाने हॅटट्रिक केली. त्यानंतर १९९७, २००५ मध्ये आणि २०१३ मध्ये भारतात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद त्यांनी मिळवले होते. वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन उपविजेतेपद देखील त्यांच्या नावावर आहेत. २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

वाचा-
सर्वाधिक विजेतेपदाबाबत ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडचा क्रमांक लागतो. त्यांनी १९७८, १९८२, १९८८, १९९७ आणि २००७ अशी चार वेळा तर न्यूझीलंडने २००० मध्ये एकदा विजेतेपद मिळवले आहे.

वाचा-

टी-२० वर्ल्ड कप-
आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची सुरूवात २००९ मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत ७ वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या आहेत. त्यापैकी ५ वेळा ऑस्ट्रेलियाने चषक उंचावला आहे. यावरून ऑस्ट्रेलिया संघाची टी-२० वर्ल्ड कपमधील मक्तेदारी दिसून येते. २०१०, २०१२ आणि २०१४ अशी सलग तीन विजेतेपद त्यांनी मिळवली. २०१६ मध्ये देखील ते फायनलमध्ये पोहोचले होते. पण वेस्ट इंडिजच्या संघाने त्यांचा पराभव केला. त्यानंतर २०१८ आणि आता २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा विजेतेपद मिळवले. सात वर्ल्ड कप स्पर्धेपैकी ऑस्ट्रेलियाशिवाय फायनल मॅच फक्त एकदाच झाली आहे ती म्हणजे २००९ मधील फायनल मॅच होय. तेव्हाची फायनल इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाली होती . त्यानंतर प्रत्येक टी-२० फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया खेळली आहे.

वाचा-
ऑस्ट्रलियानंतर इंग्लंडने (२००९) आणि वेस्ट इंडिजने (२०१६) प्रत्येकी एकवेळा टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here