महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामाना करावा लागला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८५ धावांनी पराभूत केले. पण या पराभवानंतरही आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी महिला संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. भारतीय संघाचे भवितव्य उज्वल आहे, अशा शुभेच्छाही पवार यांनी भारतीय महिला संघाला दिल्या आहेत.
वाचा-

भारतीय संघ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीती पोहोचला, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण या विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. पण अंतिम फेरीत मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली.

वाचा-

भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी त्यांची कामगिरी चांगलीच झाली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, ” आपल्या भारताच्या महिला संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. पण भारतीय संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. महिला संघाने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. भारतीय संघाचे भवितव्य उज्वल आहे. भारतीय संघाला यापुढील यशासाठी शुभेच्छा.”
वाचा-

भारतीय संघ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघ पारभूत होण्याच्या मार्गावर आहे. पण या अंतिम फेरीचा एक टर्निंग पॉइंट ठरला आहे. त्यामुळेच भारताला हा सामना गमवावा लागला असे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. सलामीवीर एलिसा हिलीने हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण हिलीने यावेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

हिलीने पहिल्या चेंडूवर दीप्ती शर्माला चौकार लगावत धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण त्यानंतर पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर दीप्तीने स्वत:च्याच गोलंदाजीवर हिलीचा झेल सोडला. त्यानंतर हिलीच्या फलंदाजीचे तुफान मैदानात पाहायला मिळाले. हिलीने ३९ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या आणि त्यामुळेच सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला. चौथ्या षटकातही ऑस्ट्रेलियाची दुसरी सलामीवीर बेथ मुनीला जीवदान मिळाले, पण तोपर्यंत हिलीने भारतीय गोलंदाजीला चांगलेच धारेवरव धरले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here