भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सिक्सर किंग युवराज सिंग यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे स्पष्ट विधान भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले आहे. युवराज आणि धोनी यांना एक क्रिकेटपटू म्हणून तोड नाही, असे प्रसाद यांचे म्हणणे आहे.

धोनीने भारताला आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकवून दिल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली आणि २०११ साली वनडे विश्वचषकाला गवसणी घातली. युवराजची कामगिरी आतापर्यंत सर्वच मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार राहीलेली आहे. कारण २००७ साली झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात युवराजने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात सलग सहा षटकार लगावले होते. त्याचबरोबर २०११ साली झालेल्या वनडे विश्वचषकात युवराज सिंग हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

धोनी आणि युवराज यांच्याबद्दल प्रसाद म्हणाले की, ” धोनी आणि युवराज यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. कारण सध्याच्या घडीला त्यांची जागा घेऊ शकेल, असा कोणताही खेळाडू मला दिसत नाही. त्यामुळे या दोन खेळाडूंची उणीव संघाला नेहमीच भासत राहील.”

प्रसाद पुढे म्हणाले की, ” धोनी आणि युवराज हे दोघेही महान क्रिकेटपटू आहेत. त्यांची जागा घेणारे युवा खेळाडू सध्याच्या घडीला तरी मला दिसत नाहीत. धोनी आणि युवराजसारखे खेळाडू मिळणं कठिण आहेत. आम्ही काही वेळा त्यांच्यासारखी गुणवत्ता शोधायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न अजूनही सुरु आहे.”

महेंद्र सिंह धोनी आयपीएलच्या तयारीला लागला आहे. चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर धोनी सराव करत आहे. चेन्नई संघाचा सराव पाहण्यासाठी चाहते देखील येत आहेत. या सराव सत्राचा एक व्हिडिओ चेन्नई संघाने शेअर केला आहे. या व्हिडिओतून धोनीचा दमदार पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचे दिसते. चेन्नई सुपर किंग्जने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. धोनी आता भारतीय संघात पुन्हा कधी दिसणार, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागलेली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here