वाचा-
फायनल मॅचनंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर शोएब अख्तरने एक ट्वि्ट केले आहे. ज्यात त्याने वॉर्नरच्या जागी पाकिस्तानचा कर्णधार याला मालिकावीर पुरस्कार दिले पाहिजे असे म्हटले आहे. बाबरला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पाहण्यास उत्सुक होतो. माझ्यासाठी तरी हा निर्णय (वॉर्नरला पुरस्कार देण्याचा) चुकीचा आहे.
वाचा-
आयपीएलमध्ये खराब फॉर्ममुळे आधी कर्णधारपद आणि नंतर संघातून बाहेर करण्यात आलेल्या डेव्हिड वॉर्नरने टी-२० वर्ल्डकपमध्ये देशाकडून जबरदस्त कामगिरी केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच बरोबर डेव्हिड वॉर्नरने देखील मागे नाही. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांच्यात फक्त १४ धावांचा फरक आहे. पण वॉर्नरचा संघ चॅम्पियन ठरला आणि त्याने फायनलमध्ये देखील विजयात महत्त्वाची खेळी केल्याने त्याचा फायदा त्याला मिळाला.
वाचा-
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
बाबर आझम- ३०३ धावा
डेव्हिड वॉर्नर- २८९ धावा
मोहम्मद रिझवान- २८१ धावा
जोस बटलर- २६९ धावा
सी असालंका- २३१ धावा
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची भेट घेतली. याचा फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times