आयपीएल सुरु होण्यापूर्वीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या संघातील एक महत्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्याने एका स्पर्धेतून माघार घेतल्याचे दिसत आहे.
मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू कायरन पोलार्ड हा सध्या दुखापतीमुळे बेजार झाला आहे. त्यामुळेच त्याने पाकिस्तान प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. आता आयपीएल काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे पोलार्डला या दुखापतीमधून सारवण्यासाठी काही दिवस लागतील. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

�� ruled out of #HBLPSLV.

A post shared by Pakistan Super League (@thepsl) on

भारतामध्ये सध्या ‘करोना’चा थोड्या प्रमाणात प्रदुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला करोना वायरसचे ४२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेली आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार सुरु आहे. करोना वायरस रोखण्यासाठी आता आयपीएल एक वेगळीच शक्कल लढवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ही शक्कल जर यशस्वी ठरली तर आयपीएल सुनियोजित वेळेत होऊ शकते, असे आयपीएलच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

वाचा-

आयपीएल पुढे ढकलली तर बीसीसीआयला मोठे नुकसान होऊ शकते आणि बीसीसीआयला ते होऊ द्यायचे नाही. त्यामुळे आयपीएल सुनियोजित वेळेत कशी करायची, याचा विचार बीसीसीआयमधील चाणक्यांनी केला आहे. आयपीएल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजारोंच्या पटीने प्रेक्षक जमतात आणि त्यामुळे करोना वायरसचा प्रसार होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या कारणांमुळेच आयपीएल पुढे ढकलण्याचा विचार आरोग्य मंत्री करत आहेत. पण बीसीसीआयने आता एक शक्कल लढवली आहे. आयपीएलचे सामने ते वेळेनुसारच आयोजित करणार आहेत, पण या सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एंट्री दिली जाणार नाही, असे केल्यास आयपीएल पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकत नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

करोना वायरसने सावट सध्याच्या घडीला जगभरात पसरले आहे. त्यामुळे या गोष्टीचा फटका आता भारतामधील गर्भश्रीमंत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगलाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना वायरसमुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here