‘करोना’ वायरसचा प्रकोप आता चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवरही होणार असल्याचे दिसत आहे. जर ‘करोना’ वायरस आटोक्यात आणला नाही तर ऑलिम्पकही रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

दर चार वर्षांनी क्रीडा जगताचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील टोकिओमध्ये करण्यात आले आहे. पण जर ‘करोना’ वायरसचा प्रसार थांबला नाही तर आता ऑलिम्पिकही रद्द करण्यात येऊ शकते.

जपानमध्ये सध्या ‘करोना’ वायरसचा प्रसार झाला आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जगभरातून खेळाडू जपानमध्ये दाखल होणार आहेत. यामध्ये चीनचाही समावेश आहे. त्यामुळे जर लवकर करोना आटोक्यात आला नाही तर ऑलिम्पिक रद्द करण्याचा विचार सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमधील एका अधिकाऱ्याने यावेळी सांगितले की, ” सध्याच्या घडीला जगभरात ‘करोना’ वायरसचा प्रसार झाला आहे. त्यामुळे जर मे महिन्यापर्यंत या ‘करोना’ वायरसवर काही उपाय केला गेला नाही तर टोकिओ ऑलिम्पिक रद्द करावे लागू शकते. सध्या फारच कमी कालावधी ऑलिम्पिकसाठी उरला आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये दुसऱ्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा खेळवता येणार नाही, त्यामुळे जर करोनावर काही उपाय होऊ शकला नाही तर ऑलिम्पिक रद्द करण्यावाचून दुसरा पर्याय नसेल.”

टोकिओ ऑलिम्पिकला २४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. ऑलिम्पिकपूर्वी टॉर्च लाइटिंग हा एक कार्यक्रम करण्यात येतो. यंदा १२ मार्चला ग्रीस येथील ऑलिम्पिया येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण या कार्यक्रमाला कोणत्याही चाहत्याला प्रवेश दिला जाणार नाही. हा समारोह फक्त १०० मान्यताप्राप्त पाहुण्यांपुढे होणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here