मुंबई: अनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताकडून इरफान पठाणने नाबाद ५७ धावांची वादळी खेळी केली.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १३८ धावा केल्या. १३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. विरेंद्र सेहवाग (३), कर्णधार (०) आणि युवराज सिंह (१) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मोहम्मद कैफ आणि संजय बांगर यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागिदारी केली. बांगर १८ धावांवर बाद झाले. त्यापाठोपाठ कैफ ४६ धावांवर माघारी परतला.

वाचा-
भारतीय संघाला अखेरच्या पाच षटकात ५५ धावांची गरज होती. तेव्हा इरफान पठाणने वादळी खेळी केली. त्याने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. इरफानने मनप्रीत गोनीसह सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागिदारी केली. यामुळे भारताने लंकेवर ५ विकेटनी विजय मिळवला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here