धर्मशाळा: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना आज धर्मशाळा येथे होत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीवर सर्वांची नजर असणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात रन मशीन विराटला धावा करण्यात अपयश आले होते. आता आफ्रिकेविरुद्ध तो कशी कामगिरी करतो यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या वनडेत विराटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.

आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला फक्त १३३ धावांची गरज आहे. विराट सध्या खराब फॉर्ममध्ये असले तरी तीन सामन्यांच्या मालिकेत विराट हा टप्पा पार करू शकतो.

वाचा-
विराटने वनडेमधील २३९ डावात ११ हजार ८६७ धावा केल्या आहेत. जर विराटने पुढील काही डावात १२ हजार धावांचा टप्पा पार केला तर तो सर्वात वेगाने १२ हजार धावा करण्याचा सचिनचा विक्रम मागे टाकले. सचिनने ३०० डावात १२ हजार धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ३१४ डावात तर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने ३३६ डावात अशी कामगिरी केली होती.

वाचा-
भारतीय संघाने नुकताच न्यूझीलंड दौरा केला. या संपूर्ण दौऱ्यात विराटकडून धावा झाल्या नाहीत. आता आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटला मोठी खेळी करण्याची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराटने ५१, १५ आणि ९ अशा धावा केल्या होत्या. कसोटी मालिकेत देखील विराटला अपयश आले होते. त्याने २,१९, ३ आणि १४ अशा धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here