नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोलकातामधील ईडन गार्डन मैदानाचे खास असे स्थान आहे. या मैदानावर अनेक विक्रम झाले आहेत. २० वर्षांपूर्वी याच मैदानावर एक अफलातून कसोटी सामना झाला होता. भारतीय क्रिकेटचा इतिहास या सामन्याशिवाय पूर्ण होणार नाही.

ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर होता. कर्णधार स्टीव वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने मुंबईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव केला होता. हा ऑस्ट्रेलियाचा कसोटीमधील सलग १६ वा विजय होता. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने ४४५ धावा केल्या. यात वॉच्या ११० आणि मॅथ्यू हेडनच्या ९७ धावांचा समावेश होता. त्यानंतर भारताचा पहिला डाव १७१ धावांवर संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन दिला आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रवीड यांच्या शानदार शतकी खेळीने भारताने ७ बाद ६५७ धावा केल्या. या सामन्यात लक्ष्मणने १७१ तर द्रवीडने १८० धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८४ धावांची गरज होती. पण हरभजन सिंगने सहा विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा २१२ धावांवर ऑल आउट केले.

वाचा-

हरभजनची हॅटट्रिक
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ७२व्या षटकात ४ बाद २५२ धावा असताना हरभजनने दुसऱ्या चेंडूवर रिकी पॉन्टिंगला बाद केले. त्यानंतर अॅडम गिलख्रिस्टला LBW केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर हरभजनने शेन वॉनला बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा हरभजन हा पहिला फिरकीपटू ठरला होता.

या सामन्यात हरभजनने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात ६ विकेट घेतल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here