मेलबर्न: झालेल्या नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील फायनल मॅच झाली. हा सामना पाहण्यासाठी जवळपास ९० हजार प्रेक्षक आले होते. या प्रेक्षकांपैकी एका प्रेक्षकाला करोना व्हायरस झाल्याचे समोर आले आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

वाचा-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी ८६ हजार १७४ प्रेक्षक आले होते. ज्या व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झाली आहे तो मैदानावरील सेक्शन ए ४२ मधील नॉर्दन स्टँडच्या लेव्हर २ येथे बसला होता. आरोग्य विभागाने एन ४२ मध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांना नियमीत दिनक्रम सुरू ठेवण्यास आणि स्वच्छ राहण्याची सूचना केली आहे. जर खोकला आणि सर्दी सारखी लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे.

वाचा-

ऑस्ट्रेलियामध्ये देखील करोनाचे ११२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. महिला टी-२०ची फायनल मेलबर्न येथे झाली होती. मेलबर्न हा व्हिक्टोरिया प्रांताची राजधानी आहे. या प्रांतात करोना व्हायरसचे ११ जण आढळले आहेत.

वाचा-
मेलबर्न शहरात राहणाऱ्या एका डॉक्टरला करोना व्हायरसची लागण झाली आहे. या डॉक्टरने ऑस्ट्रेलियातील ७० करोना रुग्णांवर उपचार केले होते. त्यानंतर ते स्वत: करोना बाधित झाले. संबंधित डॉक्टराने स्वत: ला घरात बंद करून घेतले आहे जेणे करुन अन्य कोणाला याची लागण होऊ नये.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here