‘करोना’ वायरसचा प्रकोप सध्या जगभरात होत आहे. यामधून क्रीडा विश्वही सुटलेले नाही. सध्याच्या घडीला ‘करोना’ वायरसमुळे आयपीएल खेळवायची की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे जगविख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही ‘करोना’ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे रोनाल्डोचे करोडो चाहते आता टेंशनमध्ये आले असून त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

सध्याच्या घडीला रोनाल्डो हा आपल्या घरातच आहे. तो इटलीमध्ये जुवेंट्स या संघासाठी खेळण्यासाठी काही दिवसांपूर्वी मैदानात उतरला होता. पण आता ‘करोना’च्या भितीमुळे तो घरातून बाहेरच पडत नसल्याचे समजत आहे.

नेमके घडले तरी काय…रोनाल्डो हा इटलीमधील जुवेंटस या संघाकडून लीगमध्ये खेळतो. या संघातील बचावपटू डॅनियल रुगानी ‘करोना’ बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुवेंट्सचा संघ आठ मार्चला आपला अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात डॅनियलबरोबर रोनाल्डोही खेळला होता. त्यामुळे रोनाल्डोलाही ‘करोना’ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे रोनाल्डोने सध्या खबरदारीचा उपाय घेतला आहे.

रोनाल्डो इटलीवरून पोर्तुगालला गेला तरी कसारोनाल्डो आठ मार्चला डॅनियलबरोबर खांद्याला खांदा लावून सामना खेळला. त्यानंतर रोनाल्डोच्या आईला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे आईची काळजी घेण्यासाठी रोनाल्डो इटलीवरून पोर्तुगालला गेला. तोपर्यंत कोणालाही डॅनियलला ‘करोना’ची लागण झाली आहे, हे कुणालाही माहिती नव्हते.

रोनाल्डो संघाबरोबर सराव करणार नाहीरोनाल्डो सध्या पोर्तुगालमध्ये आहे. पण तो आगामी सामन्यांसाठी संघाबरोबर सराव करणार नाही. त्याचबरोबर रोनाल्डो हा काही दिवस पोर्तुगाल सोडणार नसून आपल्या घरीच राहणार आहे, असे जुवेंट्स संघाच्या व्यवस्थापकाने सांगितले आहे.

पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो २०२० फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत युक्रेनविरुद्ध पेनल्टी स्पॉटवर ७२व्या मिनिटाला गोल होता. हा ३४ वर्षीय रोनाल्डोचा कारकिर्दीतील ७००वा गोल ठरला. मात्र, संघाला पराभवापासून रोनाल्डो वाचवू शकला नाही. ही लढत युक्रेनने २-१ने जिंकली. पण या लढतीनंतर रोनाल्डोच्या खेळात बदल झालेला पाहायला मिळाला, असे चाहते म्हणत होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here