मुंबई: व्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. करोनामुळे यंदा स्पर्धा होणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे की करोनामुळे यावेळची आयपीएल स्पर्धा होणार की नाही. केंद्र सरकारने यंदा आयपीएल स्पर्धा घेऊच नका असा सल्ला दिला आहे. याच बरोबर केंद्राने १५ एप्रिलपर्यंत परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्यास देखील नकार दिला आहे. स्पर्धा होणार की नाही याबद्दल अद्याप बीसीसीआयने गोष्टी स्पष्ट केल्या नाहीत.

वाचा-
शनिवारी आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलची बैठक होणार आहे. त्याआधी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत होईल. गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीआधी क्रीडा मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध झालेल्या आदेशावर चर्चा करणार आहे.

क्रीडा मंत्रालयाने देशात आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत सर्व खेळ हे बंद दरवाज्यात म्हणजेच रिकाम्या मैदानात खेळेल जावेत, असे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. या आदेशानंतर बीसीसीआय किंवा आयपीएलकडून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही.

वाचा-
आम्ही वाट पाहत आहोत आणि परिस्थितीवर नजर ठेवून आहोत, असे बीसीसीआयने म्हटले आहे. कोणताही सामना रद्द करण्यासाठी ४८ तास लागतात. पण त्याच्या आयोजनासाठी अनेक आठवडे लागतात. क्रीडा मंत्रालयाने रिकाम्या मैदानावर स्पर्धा खेळवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे आयपीएलच्या आयोजनावर कोणताही परिणाम होईल असे वाटत नाही.

काय होऊ शकते?
बीसीसीआयने स्पर्धा नियोजित वेळेनुसार होईल असे म्हटले आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा स्थगित केली जाऊ शकते किंवा त्याचे स्वरुप बदलले जाईल. स्पर्धा छोट्या स्वरुपात घेतल्यामुळे सामने रिकाम्या मैदानात घेता येतील.

वाचा-

रद्द होण्याची शक्यता किती
सध्या तरी आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता नाही. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या सल्ल्यावर बीसीसीआय विचार करत आहे. त्याच बरोबर बीसीसीआय त्यांच्या दुसऱ्या पर्यायावर देखील विचार करत असल्याचे समजते. जर करोना व्हायरची परिस्थिती आणखी बिघडली तर स्पर्धा रद्द होऊ शकते. आयपीएल सुरू होण्यास १७ दिवस शिल्लक आहे आणि प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे.

कसे असेल नवे स्वरुप
प्रेक्षकांशिवाय स्पर्धा आयोजित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सामन्यांचे ठिकाण बदलू शकते. त्याच बरोबर आठ संघांना दोन गटात विभागले जाऊ शकते. जसे २०११ मध्ये केले होते. त्यानंतर २० ते २५ साखळी सामन्यानंतर अंतिम फेरीचा सामना खेळवला जाऊ शकतो आणि स्पर्धा एका महिन्याच्या आत पूर्ण केली जाऊ शकते.

परदेशी खेळाडूंचे काय?
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा व्हिसा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. आयपीएलमधील सर्व संघांची इच्छा आहे की परदेशी खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा खेळवण्यास संघांचा नकार नाही. पण परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी द्यावी, असे संघांचे म्हणणे आहे.

वाचा-
करोना व्हायरसमुळे आयपीएल संदर्भातील अधिकाऱ्यांची काही दिवसांपासून झोप उडाली आहे. स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात काहीही बदल झाला तर संबंधित अधिकाऱ्यांना वेगाने नियोजनात बदल करावा लागले. यात हॉटेल, विमान बुकिंग, स्पर्धेचे ठिकाण आदी गोष्टींचा समावेश असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here