वाचा-
एनबीएचे दोन खेळाडू आणि डोनोवेन मिशेल यांना करोना व्हायरस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात प्रथम रूडीला करोना झाल्याचे समोर आले होते. त्याने करोनाची लागण होऊ नये म्हणून काळजी घेतली नसल्याचे समोर आले आहे.
वाचा-
उहाट जैस आणि ओकालहोमा सिडी थंडर यांच्यातील सामन्याआधी रूडी पत्रकार परिषदेत आला होता. पत्रकारांशी बोलल्यानंतर त्याने गंमतीने तेथे ठेवण्यात आलेल्या सर्व माइक आणि रेकॉर्डिंग डिव्हायसला हाताने मुद्दम स्पर्ध केला होता. रूडीला असे दाखवायचे होते की करोना अशा पद्धतीने पसरत नाही. या कृतीतून त्याने एक प्रकारे करोना हा चेष्टेचा विषय असल्याचे दाखवून दिले होते.
वाचा-
सध्या सोशल मीडियावर रूडीच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशाच प्रकारचे वर्तन रूडीने संघातील अन्य खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये केले होते. त्याने सर्व खेळाडूंच्या गोष्टींना मुद्दाम हात लावला होता. रूडीला करोना झाल्याचे समोर आल्यानंतर एनबीएने संपूर्ण स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रूडी शिवाय डोनोवेन मिशेलच्या वैद्यकीय चाचणीत त्याला करोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर एनबीएने संपूर्ण संघातील खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची चाचणी केली आहे. दरम्यान रूडीने स्वत:च्या बेजबाबदार वर्तनासाठी सोशल मीडियावरून माफी मागितली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times