ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूला आज उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सिंधूच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
यापूर्वी भाराताच्या सायना नेहवाहलचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे भारतीयांच्या आशा सिंधूवर टिकून होत्या. पण सिंधूच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ही स्पर्धा भारताचे माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद यांनी २००३ साली जिंकली होती. त्यानंतर एकाही भारतीय खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून सिंधूला उपांत्यपूर्व लढतीत २१-११, १५-२१, १३-२१ असा तीन गेममध्ये पराभव पत्करावा लागला.

या लढतीमधील पहिला गेम सिंधूने जिंकला होता. त्यामुळे भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या. पहिल्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळ केला आणि पहिला गेम २१-११ असा सहज जिंकला. सिंधू हा खेळत पाहता ती हा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहोचेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराने जोरदाप पुरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंकडून चांगली लढत पाहायला मिळाली. पण या गेममध्ये ओकुहाराने आघाडी घेत ती कायम ठेवली आणि त्यामुळेच सिंधूहा हा गेम गमवावा लागला.
दोन गेम्समध्ये दोन्ही खेळाडूं समान होते. दोघींनीही प्रत्येकी एक गेम जिंकला होता. त्यामुळे आता तिसऱ्या गेममध्ये नेमके काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. दुसऱ्या गेममध्ये जिंकल्यानंतर ओकुहाराचे मनोबल अधिक उंचावलेले पाहायला मिळाले. कारण तिसऱ्या गेममध्ये तिने दुसऱ्या गेमपेक्षा अधिक चांगला खेळ केला. त्यामुळे तिसरा आणि निर्णायक सेट ओकुहाराला जिंकता आला. हा सेट जिंकत ओकुहाराने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

भारताची फुलराणी आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालला आज मोठा धक्का बसला आहे. सध्या सुरु असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सायनाला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सायनाच्या ऑलिम्पिक प्रवेशाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सायनाला २८ मिनिटांमध्येच गाशा गुंडाळावा लागला. सायनावर जपानच्या आकाने यामागुचीने २१-११, २१-०८ असा विजय मिळवला. या पराभवामुळे सायनाला आता अन्य महत्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

भारताच्या सायना नेहवालला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here