वाचा-
आजच्या दिवशी म्हणजे १५ मार्च १८७७ रोजी पहिला कसोटी सामना सुरू झाला होता. हा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. क्रिकेटची सुरूवात इंग्लंडमध्ये झाली असली तरी पहिला कसोटी सामना झाला तो ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर…
१५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नवख्या संघाने अनुभवी इंग्लंडचा ४५ धावांनी पराभव केला होता. आज क्रिकेट चाहत्यांना हे वाचून धक्का बसेल की पहिल्या कसोटी सामन्यासाठी निश्चित असा कालावधी ठरवण्यात आला नव्हता. फक्त दोन्ही संघांना प्रत्येकी दोन डाव खेळायचे आहेत इतक ठरले होते आणि त्यासाठी कितीही दिवस लागले तरी चालले असते.
वाचा-
पहिला कसोटी सामना १५ ते १९ मार्च दरम्यान झाला. डेव ग्रेगोरी यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील पहिल्या डावात २४५ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव १९६ धावा संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फक्त १०४ धावा करता आल्या. त्यानंतर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव ६६.१ षटकात १०८ धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज टॉम केंडल याने दुसऱ्या डावात ५५ धावात ७ विकेट घेतल्या. या सामन्यात गोलंदाजाला एका षटकात ४ चेंडू टाकण्याची परवानगी होती.
पहिल्या कसोटी सामन्यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे सुरूवातीच्या ३ दिवसांचा खेळ झाल्यानंतर चौथा दिवस म्हणजे रविवार १८ मार्च हा रेस्ट डे होता. त्यानंतर पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
वाचा-
या कसोटी सामन्यात अल्फ्रेड शॉने पहिला चेंडू टाकला जो चार्ल्स बॅनरमॅन यांनी खेळला. बॅनरमॅन यांनी या कसोटीत १६५ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील हे पहिले शतक होते. इंग्लंडच्या अॅलन हिल यांनी कसोटीमधील पहिली विकेट आणि कॅच पकडला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सर्वाधिक १० हजार प्रेक्षक उपस्थित होते.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३१ मार्च ते ४ एप्रिल या काळात दुसरा कसोटी सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने ४ विकेटनी विजय मिळवला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times