वाचा-
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेसीने करोना संदर्भात लोकांची भीती घालवण्यासाठी एक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तो म्हणतो, ही वेळ जबाबदार आणि घरात राहण्याची आहे. आपल्यासाठी आरोग्य हेच प्राधान्य असेल पाहिजे. कुटुंबाला वेळ देण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. अशी संधी फार कमी वेळा मिळते, असे मेसीने इंस्टाग्रामवरील पोस्टवर म्हटले आहे.
वाचा-
आपल्या सर्वांसाठी हे कठीण दिवस आहेत. सध्या जगभरात जे सुरू आहे त्यामुळे सर्वच जण काळजीत आहेत. जे लोक आरोग्य केंद्रात काम करत आहेत ते कुटुंब अथवा मित्रांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांना देखील करोनाची लागण होण्याची शक्यता असते. मी अशा लोकांच्या हिमतीला आणि त्यांच्या कामासाठी शुभेच्छ देतो, असे मेसीने म्हटले आहे.
वाचा-
मेसीने घेतली सुट्टी
करोनामुळे मेसीने सर्व स्पर्धामधून माघार घेतली आहे. तो सध्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मेसी बार्सिलोना क्लबकडून खेळतो. बार्सिलोनाने सर्व स्पर्धा आणि सराव सत्र रद्द केले आहेत. असा निर्णय घेणारा तो पहिला क्लब आहे. इटलीचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने देखील सर्व स्पर्धांमधून माघार घेत घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
कोहलीने देखील केले आवाहन
कोहलीने आपल्या ट्विटरवर एक मेसेज पोस्ट केला आहे. या मेसेजमध्ये कोहलीने करोना व्हायरसचा सामना कसा करायचा, हेदेखील सांगितले आहे.
कोहलीने आपल्या ट्विटरच्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, ” सर्वांनी तंदुरुस्त राहा आणि करोना व्हायरसचा सामना करा. याबाबत आपल्याला दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सुरक्षित राहा आणि तब्येतीची हयगय करू नका. काही होण्यापेक्षा आपण सुरक्षेचा उपाय करायला हवा. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घ्या.”
(वाचा संबंधित बातमी- )
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times