नवी दिल्ली: जगभरात वेगाने पसरत आहे. काही खेळाडूंना देखील करोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त होते. चीन पाठोपाठ इटलीत करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. अशातच इटलीतून एक धक्कादायक बातमी आली आहे. इटलीतील फुटबॉल लीग सेरी-एच्या ११ खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे एकच खळबळ उडाली आहे. या सर्व खेळाडूंची करोना चाचणी झाली होती आणि त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचा-
इटलीतील लीग स्पर्धेत २० संघ खेळतात. या स्पर्धेतील ११ खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. इटलीच्या आरोग्य विभागाने नवे आदेश काढले असून सर्व खेळडूंना सराव करण्यापासून बंदी करण्यात आली आहे तसेच घरी राहण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा-
सीरी-एच्या डॉक्टरांनी स्पर्धेतील सर्व सराव सत्र रद्द करण्यास सांगितले आहे. अन्य खेळाडूंना करोना होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. लीगमध्ये खेळणाऱ्या युसी सांपडोरिया क्लबच्या सात खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर फिओरेंटीनाच्या चार खेळाडूंना करोना झाल्याचे चाचणीतून उघड झाले.

वाचा-
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेसी यांनी देखील सर्व स्पर्धा आणि सराव सत्रातून माघार घेत घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन दिवसात जगभरातील ६ खेळांच्या १४ स्पर्धा रद्द केल्या आहेत. तर स्वित्झर्लंडमध्ये १९ ते २४ एप्रिल दरम्यान होणारी वर्ल्ड स्पोटर्स अॅण्ड बिझनेस समिटी रद्द करण्यात आली आहे.

वाचा-
फुटबॉलपटूंच्या आधी अमेरिकेतील एनबीएमधील तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. सुपर लीग ग्रीसमधील एका फुटबॉल क्लबच्या मालक वेंगेलिस मारिनकिस यांना देखील करोना झाल्याचे वृत्त आहे. जगभरतील १५३ देशात करोनाचे १ लाख ५६ हजार ९३२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५ हजार ८३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

9 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here