चेन्नई: करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सराव थांबवला आणि चेन्नई सोडण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सोडताना धोनीने चाहत्यांची भेट घेतली. या घटनेचा व्हिडिओ चेन्नई संघाने शेअर केला आहे. व्हिडिओत धोनी नव्या लुकमध्ये दिसत आहे.

वाचा-
एमएस धोनी नेहमी मैदानावरील त्याच्या लुकमुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला धोनी आयपीएलच्या निमित्ताने पुन्हा एकदा मैदानावर दिसला. धोनी चेन्नईत गेल्या काही दिवसांपासून आयपीएलसाठी सराव करत आहे. पण बीसीसीआयने करोना व्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलली.

वाचा-
आयपीएलचा निर्णय अद्याप न झाल्याने चेन्नई संघाने सराव थांबवला. धोनीने देखील चेन्नई सोडण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्याने सर्वांची भेट घेतली अगदी चाहत्यांची सुद्धा.

वाचा-
एका चाहत्यानने धोनीला चेन्नई तुमचेच घर आहे सर,असे सांगितले. त्यावर धोनीने हसत होकार दिला आणि पुन्हा येणार असल्याचे सांगितले. या व्हिडिओत धोनी नव्या लुकमध्ये दिसत आहे. धोनने फ्रेंच कट दाढी ठेवली आहे.

धोनीच्या या नव्या लुकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नई सोडण्याआधी आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची भेट घेण्यास तो विसरला नाही. त्याने चाहत्यांसोबत फोटो काढले आणि त्यांना स्वाक्षरी देखील दिली.

वाचा-
आयपीएल स्पर्धा होणार की नाही याबद्दल अद्याप बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शनिवारी यासंदर्भात संघ मालकांसोबत बैठक झाली होती. या महिन्याच्या अखेरपर्यंत करोनाची परिस्थितीत कशी असते त्यावर स्पर्धेचे स्वरुप ठरवले जाण्याची शक्यता आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here