लिस्बन: करोना व्हायरसमुळे जगभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि प्रत्येक देशातील सरकार करोना संदर्भात जनजागृती करत आहेत. त्याच बरोबर व्हायरस अधिक पसरू नये म्हणून देखील प्रयत्न सुरू आहेत. अशातच प्रसिद्ध फुटबॉलपटू संदर्भात एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी रोनाल्डो संदर्भातील ही बातमी स्टेटसला देखील ठेवली आहे. जाणून घेऊयात या बातमीत किती तथ्य आहे ते….

वाचा-
करोनाविरुद्धच्या लढाईत रोनाल्डोने देखील सहभाग घेतल्याचे वृत्त स्पेनमधील आघाडीच्या मार्का या वृत्तपत्राने दिले होते. मार्काने दिलेल्या वृत्तानुसार रोनाल्डोने करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पोर्तुगालमधील त्याचे CR7 ब्रँडची सर्व हॉटेल्स रुग्णालये केल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तेथे करोनाच्या रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत असे म्हटले होते. मार्काने दिलेले हे वृत्त जगभरात वेगाने व्हायरल झाले. त्यानंतर अनेकांना हा प्रश्न पडला की खरच रोनाल्डोने असा काही निर्णय घेतला आहे का? की ही फक्त अफवा आहे.

वाचा-
यासंदर्भात पोर्तुगालमधील पत्रकार फिलिप केटानो यांनी रोनाल्डोने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मार्का वृत्तपत्राने देखील वेबसाइट आणि सोशल मीडियावरून ही बातमी मागे घेतली. रोनाल्डोचे दोन हॉटेल्स आहेत. त्यातील एक लिस्बन येथे तर दुसरे मदीरा येथे आहे. रोनाल्डोचे घर मदीरा शहरात आहे. करोनामुळे स्वत: रोनाल्डोने सामने आणि सराव सत्रात भाग न घेता घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा-

रोनाल्डो खेळत असलेल्या युवेंटस क्लबमधील खेळाडू डेनिअल रुगानीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा रोनाल्डो मदीरा शहरात होता. त्याची आईची प्रकृती ठिक नसल्याने तो घरी आला होता. त्यानंतर त्याने घरीच राहण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा-
शुक्रवारी रोनाल्डोने सोशल मीडियावर एक भावनिक मेसेज पोस्ट केला होता. करोना संदर्भात तो म्हणाला, आपण सर्वजण एका कठीण काळातून पुढे जात आहोत. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मी एक फुटबॉलपटू म्हणून नव्हे तर एक मुलगा, वडील आणि काळजी घेणारी व्यक्ती म्हणून सांगत आहे.

जागतीक आरोग्य संघटना आणि सरकारांनी दिलेल्या आदेशाचे पालन करा. व्यक्तीचे आयुष्य आणि सुरक्षा या गोष्टी अन्य गोष्टींपेक्षा महत्त्वाच्या आहेत. करोनामुळे ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे आणि जे या व्हायरसविरुद्ध लढत आहेत त्यांच्या सोबत असल्याचे रोनाल्डोने म्हटले आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here