आता आजच्या दिवशी कोणत्या तीन दिग्गजांनी निवृत्ती पत्करली होती, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. आजच्या दिवशी भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आजच्या दिवशी २०१२ साली सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम अजूनही सचिनच्याच नावावर अबाधित आहे. सचिनने एकदिवसीय कारकिर्दीमध्ये १८, ४२६ धावा केल्या आहेत. हा विक्रम आतापर्यंत एकाही क्रिकेटपटूला मोडीत काढता आलेला नाही. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकावली होती. हा विक्रमही कोणत्या क्रिकेटपटूला मोडता आलेला नाही, हा विक्रम सचिनच्याच नावावर अबाधित आहे.
सचिनबरोबर अजन दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी याच दिवशी एकदिवसीय क्रिकेटमधू़न निवृत्ती घेतली होती. हे दोन दिग्गज क्रिकेटपटू म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू कुमार संगकारा. संगकाराने आजच्याच दिवशी २०१५ साली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. संगकाराच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४, २३४ धावा जमा आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये संगकारा सचिननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
सचिन आणि संगकारा यांच्याबरोबर श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज महेला जयवर्धनेने आजच्याच दिवशी २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकात आपला अखेरचा सामना खेळला खेळला होता. संगकारा आणि जयवर्धने यांनी एकाच दिवशी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जयवर्धनेच्या नावावर १२, ६५० धावा जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये जयवर्धनेचा पाचवा क्रमांक लागतो.
सचिन, संगकारा आणि जयवर्धने या तिघांच्या धावांची बेरीज केली तर ती ४५, ३१० ए़वढी होते. त्याचबरोबर या तिघांनी मिळून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९३ शतके लगावली आहे. या ९३पैकी ४९ शतके एकट्या सचिनची आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times