वाचा-
पाकिस्तान संघात असा एक तरी खेळाडू आहे का जो भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंड सारख्या संघातील खेळाडूला बदली म्हणून खेळू शकले. या प्रश्नाचे उत्तर नाहीच असे आहे. पाकिस्तान संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. पण एकही चांगला फलंदाज नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा-
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मियादाद यांनी सांगितले की पाकिस्तान जगातील असा एकमेव संघ आहे जो खेळाडूंना जुन्या कामगिरीच्या आधारावर संघात स्थान देतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलियात प्रत्येक मालिकेतील कामगिरीच्या आधारावर संघाची निवड केली जाते. पाकिस्तान संघात एक शतक केल्यास पुढील १० सामने संघात स्थान मिळते. पाकिस्तान संघाचा हा मुख्य प्रश्न आहे.
वाचा-
भारतासारख्या संघातील खेळाडू ७०,८०,१०० किंवा २०० धावा करतात. ही खरी कामगिरी आहे. पण पाकिस्तान संघातील एकही खेळाडू टॉपचा फलंदाज नसल्याचे ते म्हणाले.
वाचा-
सांगितला अजब उपाय
फलंदाजांना जबाबदार खेळ करण्यासाठी मियादाद यांनी अनोखा उपाय सुचवला. फलंदाजाला तेव्हाच पैसे मिळतील जेव्हा तो चांगली धावसंख्या करेल, असे मियादाद यांनी सुचवले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times