भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भाराताकडून यापुढे खेळणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. आता तर भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी याबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. धोनी यापुढे आंतरारष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता फारच कमी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
वाचा-

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यास धोनी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. पण सध्याच्या घडीला आयपीएल पुढे ढकलण्यातत आली आहे. यंदाची आयपीएल होणार की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आयपीएल २९ मार्च पासून सुरु होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जर आयपीएल होऊ शकीली नाही तर धोनीचे भारतीय संघातील पुनरागममन धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे.
वाचा-

एका मुलाखतीमध्ये गावस्कर यांना धोनीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला गावस्कर यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. त्याचबरोबर करोना व्हायरसवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
वाचा-

गावस्कर धोनीबाबत म्हणाले की, ” धोनीला ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळताना पाहायची माझी इच्छा नक्कीच आहे, पण तसे होणे आता शक्य दिसत नाही. धोनी खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. धोनी स्वत: हून याबाबत काही घोषणा करेल, असे मला तरी वाटत नाही. पण हळूहळू तो क्रिकेटमधून निवृत्त होईल, असे मला वाटते.”

करोना व्हायरसमुळे गावस्कर हे गेल्या सात दिवसांपासून घरीच आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना धरमशाला येथे होणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर गावस्कर यांनी घरी राहणेच पसंत केले आहे. त्याचबरोबर सरकार जे काही करोना व्हायरसबाबत मार्गदर्शक तत्व सांगत आहेत, ती सर्वांनी पाळा.लाच हवीत, असे आवाहनही गावस्कर यांनी केले

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here